Pune : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन : गिरीश बापट

State-wide agitation on August 1 if demands of milk producers are not met: Girish Bapat : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा रामबाण उपाय नाही

एमपीसी न्यूज – कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही रामबाण उपाय नाही. जेव्हा आवश्यक होतं तेव्हा आम्ही सहकार्य केले. लॉकडाऊन वाढला तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. सरकारने याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. 31 जुलैपर्यंत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 1 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नात महायुती आक्रमक झाली असून, 31  जुलैपर्यंत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 1  ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन आणि दूधाच्या पिशव्या प्रतिकात्मक भेट दिल्या.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे (ए) शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, भाजपचे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10  रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50  रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर 30  रुपये दर द्यावा, अशा प्रमुख मागण्या महायुतीने केल्या आहेत.

राज्य शासनाने 31  जुलैपर्यंत या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा 1  ऑगस्ट 2020 रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, अशा इशाराही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

खासदार बापट म्हणाले, ‘कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही.

दुधाचे भाव 16  ते 18  रुपये लिटर इतके घसरले आहेत. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय ठराविक दूध उत्पादक संधापुरतेच मर्यादित असून, राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.