Pune : दारूच्या नशेत 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

अरणव मुखोपाद्याय (वय 36, रा. डी व्हाय पाटील रोड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.वोडाफोन मध्ये बॅक ऑफिसला तो काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अरणव याने कबुतराच्या घरट्यातून अंडी काढून त्याचे ऑम्लेट बनवून खाल्ले आणि त्यानंतर भरपूर बियर प्यायला . याच नशेत तो इकडेतिकडे पळू लागला. त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही, आणि याच नशेत त्याने 8 व्या मजल्यावरून उडी मारली आणि जीव गमावला.

याप्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.