Pune : सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व काय ? किती दिवस वडिलांच्या नावाचा फायदा घेणार ?- विजय शिवतारे

एमपीसी न्यूज- 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तोच संघर्ष आगामी लोकसभा निवडणुकीत देखील पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व काय ? आणखी किती दिवस वडीलांच्या नावाचा फायदा घेणार अशी जहरी टीका शिवतारे यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

सायकल, श्रवणयंत्र, चप्पल वाटणे अशी कामे मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. एखाद्या खासदाराचे हे काम नक्कीच नाही. बारामती मतदार संघातून खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत. राज्यात यंदा पवार यांच्या विरोधात लाट आहे. त्यामुळे समोर कोणताही उमेदवार असेल तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे शिवतारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like