Pune : बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी प्रेरणापथ उपक्रमांतर्गत मंगळवारी स्वरप्रेरणा संगीत संध्या

शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेला बंदिवान परंतु मूळचा गायक असलेल्या कलाकाराला ऑर्केस्ट्रा सुरु करून देण्यासाठी महाराष्ट्र कारागृह, प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या प्रेरणापथ उपक्रमांतर्गत नितीन आरोळे प्रस्तुत स्वरप्रेरणा संगीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी 6 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकर यांच्या समवेत इकबाल दरबार, भाई डोळे, विवेक परांजपे, संदीप पाटील आदी कलाकार सहभागी होणार आहेत. प्रेरणापथ उपक्रमांतर्गत शिक्षा भोगून बाहेर आलेल्या बंदीजनांना स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेला बंदिवान आणि मूळचा गायक असलेल्या कलाकाराला ऑर्केस्ट्रा सुरु करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अपार पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या कुटुंबियांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीतजास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन बंदीजनांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोहिमेत शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ. मिलिंद भोई व उदय जगताप याची केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.