Talegaon Dabhade : अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर तळेगावात जल्लोष

एमपीसी न्यूज- भारतमातेचे सुपुत्र रणझुंजार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर तळेगाव शहरात भारत माता की जय !आभिनंदन वर्धमान झिंदाबाद !असा जोरात जयघोष करीत तळेगावकर नागरिकांनी आनंद साजरा केला.

शुक्रवारी (दि.१) भारतमातेचे सुपुत्र रणझुंजार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होण्याची वेळ जशी जवळ येऊ लागली तशी तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात मराठा क्रांती चौकात गर्दी जमु लागली. अभिनंदन यांना सोडण्यास उशीर होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी अभिनंदन यांची सुटका होताच ‘भारत माता की जय !आभिनंदन वर्धमान झिंदाबाद !असा जोरात जयघोष सुरु झाला. आणि फटाक्यांचीआतषबाजी सुरु झाली आणि परिसर दणाणून गेला.

पेढे, मिठाई वाटण्यात आली. देश भक्तिवरील गीते वाजु लागली. या प्रसंगी किशोर आवारे मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते जायंट्स ग्रुपचे अनेक सदस्य तसेच किशोर आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, सभागृह नेते नगरसेवक सुशील सैंदाणे, रोहित लाघे, सुनील कारंडे, सचिन टकले, सुनील पवार, शेखर दाभाडे, ॲड देविदास टिळे, आण्णाराव कोळी, संदीप गोंदेगावे, नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, विराज कोळी दै.पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे तसेच नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते. यावेळी पंडीत सर, अण्णाराव कोळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.