BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मार्केट यार्ड बाजारपेठेचा संपूर्ण कायापालट करणार – गिरीश बापट

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पालकमंत्री या नात्याने मार्केटयार्ड बाजारपेठेतील काही प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याची संधी मिळाली. परंतु, अजूनही येथील कचऱ्याचा, रस्त्याचा प्रश्न तसेच फुलबाजारासाठी स्वतंत्र इमारत यासारख्या समस्या मला सोडवायच्या आहेत. भविष्यात मार्केटयार्ड बाजारपेठेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन,” अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्यांना दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गुलटेकडी मार्केटयार्ड येथे पदयात्रा काढून येथील व्यापारी, अडते, ग्राहक, तोयलाईवाले, कामगार व कष्टकरी वर्गाशी बापट यांनी अनौपाचारिक संवाद साधला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक रघुनाथ गौडा, प्रवीण चोरबोले, महेश वाभळे, राजश्री शिळीमकर, अजय खेडेकर, महेश लडकत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • यावेळी गिरीश बापट म्हणाले की, मार्केटयार्ड ही जागतिक पातळीवरील बाजारपेठ आहे. पुणे जिल्हा व शहर मधील अनेक नागरिकांची या बाजारपेठमुळे मोठी सोय झाली असून येथे चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत, या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सुटावा, फुलबाजारासाठी स्वतंत्र इमारत उभी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तसेच बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक चर्चा सुरु आहे.

ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री म्हणून काम करताना मार्केटमधील प्रश्न जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांसोबत बैठक घेतली होती. सहकारमंत्री सुभाष देशमुखही या बैठकीस उपस्थित होते. शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना समान न्याय देता यावा, यासाठी भाजप सरकार कटीबद्ध होते आणि यापुढेही असेल. नरेंद्र मोदीजींसारख्या द्रष्ट्या नेत्याची आपल्या देशाला गरज असल्याचे सांगत पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.