Pune : पुणे महापालिका करणार केंद्र सरकारच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची (Pune)अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या समाज विकास विभागाने घेतला आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग काळातील टाळेबंदीमुळे पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाल्याने त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे,अशी माहिती पुणे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शहरामध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना योजना लागू आहे. यात प्रमाणपत्रधारक तसेच ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही, त्यांना स्वयंघोषणापत्र भरून योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमुळे पथविक्रेत्यांना खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. कर्जाचा लाभ घेणाऱ्या पथ विक्रेत्यांनी विहित कालावधीत आणि नियमितपणे कर्जाची परतफेड केल्यास ते सात टक्के अनुदान मिळविण्यास पात्र होणार आहेत. व्याज अनुदानाची रक्कम पथविक्रेत्यांच्या खात्यात तिमाहीप्रमाणे जमा करण्यात येणार असून डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी रोख परताव्याची (कॅश बॅक) संधी मिळणार आहे.

Pimpri : कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत विश्वास स्पोर्ट्स क्लब च्या विद्यार्थ्यांचे यश

केंद्र शासनाच्या सनियंत्रण गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये, दुसऱ्या टप्पात वीस हजार रुपये (पहिल्या टप्प्यातील कर्ज परतफेड विहित कालावधीत आणि नियमित केल्यास) आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार रुपये (पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्ज परतफेड(Pune) विहित कालावधीत आणि नियमित केल्यास) कर्ज दिले जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.