Pune : आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड

एमपीसी न्यूज – आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड केली आहे. औरंगबाद येथे महामंडळाच्या कार्यालायात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव अग्रक्रमावर होते.  अखेर त्यांच्या नावावर एकमताने पसंती देण्यात आली.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा 2013 या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘फ्रान्सिस दिब्रिटो’ असे नाव असलेले हे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठी आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले आहे. पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. ते धर्मगुरू असले तरी त्यांचा धर्म हा चर्चपुरता मर्यादित नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.