Pune : रेल्वेचे तिकीट आणि पार्सल बुकिंगही 31 मार्चपर्यंत बंद; 31 मार्चनंतर मिळणार तिकिटांचे पैसे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 31 मार्चपर्यंत भारतातील रेल्वे सर्वच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत रेल्वेचे तिकीट बुकिंग, आरक्षित तिकीट बुकिंग आणि पार्सल बुकिंग देखील बंद राहणार आहे. प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे पैसे 31 मार्चनंतर परत मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

संपूर्ण भारतातील रेल्वेसेवा ठप्प करण्यात आली आहे. दरम्यान, मालगाड्या केवळ धावणार आहेत. आरक्षित तिकिटांसाठी ‘आयआरसीटीसी’ हा ऑनलाइन तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध असणार आहे. या सेवेचा नागरिक उपयोग करू शकतात.

ज्या रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत, त्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे तिकिटाचे पैसे रेल्वे विभागाकडून परत देण्यात येणार आहेत. 21 जून 2020 पर्यंत संबंधित प्रवाशांना त्यांचे तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यामुळे 31 मार्च नंतर प्रवाशांनी तिकिटाचे पैसे रेल्वे विभाकडून परत घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.