Pune : टीव्हीएस मोटर्सची टीव्हीएस एक्सएल-१०० बाजारात सादर

एमपीसी न्यूज – टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस एक्स एल १०० ही अत्यंत अत्याधुनिक दुचाकी बाजारात सादर केली असून वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये असलेल्या या दुचाकीस सर्वांची पसंती मिळालेली आहे.

अत्यंत सुटसुटीत रचना असलेल्या या गाडीत बटन स्टार्ट हे नवीन फीचर सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. बटन स्टार्ट, वजनाने अत्यंत हलकी आणि स्वार होण्यास अत्यंत आरामदायी या दुचाकीची महत्त्वाची काही वैशिष्ट्ये सांगताना एस. वासुदेवन, उपाध्यक्ष, टीव्हीएस मोटर्स, म्हणाले की ग्राहकांच्या पसंतीचा ब्रॅंड म्हणून टीव्हीएसच्या दुचाकी ओळखल्या जातात. या नवीन दुचाकीमुळे ग्राहकाला गर्दीतून जाताना अत्यंत आरामदायीपणे वाहतुकीतून प्रवास करता येतो. अॅटोमॅटिक गिअर प्रणालीमुळे गर्दीतील, तसेच लांब प्रवासाचा त्रास होत नाही. हायड्रोलिक सस्पेन्शन्स, १६ इंच चाके कोणत्याही अवघड मार्गावर दुचाकीधारकास प्रवासाचा कंटाळा येऊ देत नाहीत.

इझी सेंटर स्टॅंड, सिंक ब्रेकिंग तंत्रज्ञान, ९७.७ सीसीचे दणकट, स्पार्क एनर्जी इंजिन, मोबाईल चार्जिंगची सोय, लांब-रुंद सीट, क्रोम लेग गार्ड, सायलेन्स गार्डअशी अनेक वैशिष्ट्ये या गाडीत आहेत. या नवीन माॅडेलची किंमत पुढीलप्रमाणे – एक्सएल १०० कंफोर्ट आय रु. ४०,०९२ एक्स शोरुम महाराष्ट्र.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like