TVS Motors : टीव्हीएस मोटर कंपनीने फॉर्म्युला 1 ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन यांच्या “ड्राईव्ह एक्स” स्टार्ट-अप मध्ये केली गुंतवणुकीची घोषणा

एमपीसी न्यूज : जागतिक स्तरावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे अग्रगण्य उत्पादक असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज नारायण कार्तिकेयन यांच्या पूर्व मालकीचे दुचाकी प्लॅटफॉर्म स्टार्ट-अप असलेल्या “ड्राईव्ह एक्स” मध्ये गुंतवणुकीची घोषणा केली. टीव्हीएस मोटरला पूर्व-मालकीच्या दुचाकी बाजारपेठे मध्ये मजबूत क्षमता दिसत असूनअसंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे संरचनात्मक बदल होत असल्याचे हे लक्षण आहे. (TVS Motors) पूर्व-मालकीच्या दुचाकींची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि अलिकडच्या वर्षांत डिजिटायझेशन आणि स्टार्ट-अप्सच्या उदयामुळे उच्च पातळीवरील गुंतवणूकदार आणि ग्राहकांची आवड यात निर्माण झाली आहे. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सक्षम करण्याच्या उद्देशाने ड्राईव्ह एक्स मधील ही गुंतवणूक आहे.

भारतातील पहिले  फॉर्म्युला 1 ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍रेसिंग ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन यांनी स्थापन केलेले ड्राईव्ह एक्स हे पूर्व मालकीच्या दुचाकी वाहन मूल्य साखळीतील पूर्णत: एकात्मिक मॉडेल आहे. यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅंडच्या पूर्व मालकीच्या दुचाकींची खरेदी, नूतनीकरण आणि किरकोळ विक्री यासह सर्व मुख्य क्षेत्रांचा समावेश आहे. एप्रिल 2020 मध्ये ड्राईव्ह एक्स ने परवडणाऱ्या किंमतीत आणि लवचिक दळणवळण सुविधा उपाय पुरवत दुचाकी सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केली आणि अल्पावधीत पाच शहरांमध्ये विस्तार केला.

Khadakwasla Dam: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला कमी  

या प्रसंगी बोलताना ड्राईव्ह एक्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कार्तिकेयन म्हणाले, “पूर्व मालकीची दुचाकी वाहनांची बाजारपेठ आज झपाट्याने बदलत आहे.(TVS Motors) विविध मूल्य साखळींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण-आधारित क्षमतेसह असलेल्या सर्व ब्रँडची सेवा देणारा ड्राईव्ह एक्स हा एक डिजिटल फर्स्ट व्यवसाय आहे. पूर्व-मालकीच्या दुचाकी विभागातील सबस्क्रिप्शन मॉडेलसह नवीन बिझनेस मॉडेल्स सादर करण्यातही आम्ही यशस्वी झालो आहोत. येत्या काही वर्षांत, ड्राईव्ह एक्स संपूर्ण भारतामध्ये आणि त्यानंतर इतर भौगोलिक क्षेत्रांमध्येही आपले स्थान मजबूत करण्याचे ध्येय ठेवणार आहे. टीव्हीएस मोटर कंपनीच्या या गुंतवणुकीमुळे आम्हाला ड्राईव्हएक्सच्या दृष्टिकोनाचा विस्तार करण्याचा आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करेल असा पूर्व-मालकीचा दुचाकी व्यवसाय क्षेत्रात सेवा देण्याचा विश्वास आहे.”

गुंतवणुकीची घोषणा करताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, “पूर्व मालकीची दुचाकी बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात असंघटित आहे. ड्राईव्ह एक्स ने अल्पावधीत जे निर्माण केले आणि वितरित केले आहे हे पाहणे आनंददायी आहे.(TVS Motors)नारायण आणि त्यांच्या टीमने वेगाने विस्तार होऊ शकेल असा एक अनोखा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि नाविन्यपूर्ण उपायांद्वारे ग्राहक अनुभव याद्वारे विश्वास, खात्री आणि पारदर्शकता निर्माण करून या विभागात बदल घडवून आणण्याची दृष्टी ड्राईव्ह एक्स कडे आहे. या दृष्टिकोनावर आधारित सेवा देण्याच्या ड्राईव्ह एक्स च्या क्षमतेबद्दल आम्हाला खात्री आहे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.