Khadakwasla Dam: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला कमी  

एमपीसी न्यूज: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 8560 क्युसेक विसर्ग कमी करून आज पहाटे 5 वा. 6848 क्यूसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी. असेही भंडलकर यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.