Pune : येरवडा कारागृहात कैद्याच्या दोन गटांत हाणामारी; एक कैदी जखमी

एमपीसी न्यूज – येरवडा कारागृह आज मंगळवारी पहाटे सहा वाजता दोन गटात जबर मारहाण झाली. यात मोक्कांतर्गत कारागृहात असणाऱ्या तुषार नामदेव हंबीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, वाद कशामुळे झाला? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील एका खोलीतखून प्रकरणातील शाहरूख शेख आणि तुषार हंबीर हे दोघेही आरोपी होते. या दोघांमध्ये आज सकाळी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले.

  • यामध्ये शाहरुख शेख याने केलेल्या मारहाणीत तुषार हंबीर हा गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तुषार हा हिंदुराष्ट्र सेनेचा कार्यकर्ता आहे. खिळे आणि दगडाने त्याला मारहाण करण्यात आली. यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच कोणत्या कारणावरून वाद झाला? याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार यांनी म्हटले असल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.