Pune : ‘भाई’चा बर्थडे भोवला, रस्त्यावर आरोपीचा केक कापणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज : पुण्याच्या जनवाडी (Pune) परिसरात जेलमध्ये असणाऱ्या भाईचा वाढदिवस साजरा करणे चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी या सगळ्या तरुणांना अटक केली असून जिथे केक कापला तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली.

तर झाले असे, की रात्री बारा वाजता काही तरुण वाढदिवस साजरा करत होते. पण ज्या व्यक्तीचा वाढदिवस होता, तो मात्र जेलमध्ये होता. मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र या पोरांनी “भाईंचा” वाढदिवस साजरा केला.

Pune : गोवा स्केटिंग फेस्टिवल रोलर्स स्पोर्ट्स राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या प्रणव गुंड याला दोन पदके

वाढदिवसासाठी आणलेला केक हा खास होता. येरवडा जेलची प्रतिकृती असलेला केक आणण्यात आला होता. त्यावर होता भाईचा फोटो आणि येरवडा कारागृहाचा फोटो. रस्ता अडवून, दुचाक्या उभ्या करून, तुरुंगात असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा झाला आणि केक या पोरांनी तलवारीने कापला.

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत (Pune) पोहोचला. आता पोलिसांनी या सगळ्या तरुणांना अटक केली असून जिथे केक कापला तिथूनच त्यांची धिंड काढली आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या तरुणांना या कारवाईने चांगलाच फटका बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.