Pune : ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत पुणे टपाल विभागातर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज :“हर घर तिरंगा 2.0” अभियाना अंतर्गत दि.13. ते 15 ऑगस्ट दरम्यान (Pune) प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलेले आहे. यासाठी भारतीय टपाल विभागाला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वज पोहचवण्याचे महत्त्वाचे कार्य सोपवण्यात आले आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून पुणे शहर पूर्व टपाल विभागातर्फे जनजागृतीसाठी शुक्रवार (दि. 11 ) रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी रोड, पुणे कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. या बाईक रॅलीची सांगता पुणे प्रधान डाक कार्यालय (पुणे जी पी ओ) येथे करण्यात आली.

PMPML : पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात – पालकमंत्री

या बाईक रॅलीचे आयोजन डॉ.अभिजीत इचके, वरिष्ठ अधीक्षक, पुणे शहर पुर्व टपाल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने टपाल विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

सांगता समारंभास संबोधित करतांना अधीक्षकांनी प्रत्येक नागरिकाने (Pune) आपल्या घरावरती तिरंगा फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87df1251af9e2197',t:'MTcxNDcyNjk0My4yNjYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();