Pune : पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते यांची पिंपरी-चिंचवड ॲड बार असोसिएशनने घेतली भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे (Pune) शुक्रवारी (दि.11) मुंबई उच्च न्यायालय येथील पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते यांची भेट घेण्यात आली. नेहरूनगर पिंपरी येथे नव्याने झालेल्या कोर्टामध्ये वकिलांसाठी कँटीन, झेरॉक्स मशीन, सिनियर डिव्हिजन कोर्ट, मोटर वाहन कोर्ट, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे कोर्टाच्या नव्या जागेचे भूमिपूजन व बांधकाम सुरु करण्याबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.

पिंपरी नेहरूनगर कोर्टात कँटीनचे जादा भाडे पी. डब्यु. डी. विभागाने आकारले होते ते भाडे कमी करून व झेरॉक्स मशीन तातडीने चालू करण्याच्या सूचना न्यायाधीश डेरे यांनी जिल्हा न्यायाधीश पुणे यांना दिल्या आहेत.

त्यानुसार लवकरच कँटीन व झेरॉक्स मशीन चालू होणार आहे. तसेच मोशीच्या जागेवर पुढील महिन्यांमध्ये लवकरच कोर्ट उद्घाटनाची तारीख निश्चित करून भूमिपूजन होणार आहे.

Pune : ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत पुणे टपाल विभागातर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

तसेच सिनियर डिव्हिजनबाबत पेंडिंग केसेसचा आहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच सिनियर डिव्हिजन नेहरूनगर पिंपरी कोर्टाला मिळणार आहे. तसेच मोटर वाहन कोर्टाबाबत देखील पिंपरी-चिंचवड भागातील पेंडिंग केसेसचा अहवाल घेऊन त्यावर देखील मोटर वाहन कोर्ट देण्याबाबत सकारात्मक (Pune) चर्चा झाली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशन.तर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.