Pune Vehicle Theft: सराईत वहान चोराला पुण्यात बेड्या

एमपीसी न्यूज: सराईत वहानचोराला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत.(Pune Vehicle Theft) असिफ अकबर शेख (वय 30) असे अटक आरोपीचे नाव आहे. शेख याच्याकडून पोलिसांनी 2 लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

Mumbai Threat News: मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर पोलीस ठाण्यातील तपासी पथक चोरीला गेलेल्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांनी 35 सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्याच्या मदतीने पोलिसांनी शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्याच्यावरील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्यातील दोन लष्कर पोलीस ठाणे येथील असून एक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथील गुन्हा आहे.(Pune Vehicle Theft) यात पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख 7 हजार 500 रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.याचा पुढील तपास लष्कर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.