रविवार, जानेवारी 29, 2023

Pune News : अफवांवर विश्वास ठेवू नका, विक्रम गोखलेंवर उपचार सुरु, मित्र राजेश दामलेंची माहिती

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे.(Pune News) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजेश दामले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे

विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे..डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत…त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही..त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही..नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे विक्रम गोखले यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी सांगितले आहे.

Pune News : बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील

गोखले कुटुंबाची आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर यांची एक बैठक पार पडली. अभिनेते विक्रम गोखले हे आय सी यू मध्ये आहेत.ते व्हेंटिलेटर वर आहेत.(Pune News) डॉक्टर त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.उद्या सकाळी 11 वाजता पुढचे बुलेटिन होईल अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी दिली.

 

 

Latest news
Related news