Pune : विकसित भारताकडे जाणारा अर्थसंकल्प – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, (Pune)ही पगारदार वर्गासाठी दिलासादायक बाब आहे.

गरीब कल्याणाचा अजेंडा पुढे नेत महिला, शेतकरी, गरीब आणि युवा या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

PCMC : महापालिकेच्या मुख्य अभियंता यांच्याकडे कामकाजाचे वाटप; कोणाकडे कोणता विभाग?
दहा वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढले आहे असून 25 कोटी गरीब लोकांना दारिद्र्याबाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले, ही निश्चित समाधानाची बाब आहे.
1 कोटी कुटुंबियांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्पही महत्त्वाचा ठरणारा आहे.

 

शिवाय स्वतःचं घर साकारण्याची योजना, युवकांसाठी स्टार्टअप, लखपती दिदी योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी या सर्व बाबी विकसित भारताची दिशा ठरवणाऱ्या आहेत. विकसित भारताच्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन !

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.