PCMC : महापालिकेच्या मुख्य अभियंता यांच्याकडे कामकाजाचे वाटप; कोणाकडे कोणता विभाग?

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य (PCMC)संवर्गातील शहर अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्याकडे विविध विभागांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता या पदावर(PCMC) मकरंद निकम कामकाज पाहत आहेत तर नुकतेच मुख्य अभियंता पदी श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांची नेमणूक करण्यात आली होती. या तीनही अधिकाऱ्यांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी उपविभागांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे.

Pune : उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, नाविन्यता, उद्योजकता आणि पायाभूत सुविधा निर्मितीवर अर्थसंकल्पात भर – राजेश पांडे

शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, स्थापत्य विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडील स्थापत्य विषयक कामकाजाचे संपूर्ण नियंत्रण सोपविण्यात आले आहे. मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे पाणीपुरवठा व प्रकल्प विभागाचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे. मुख्य अभियंता रामदास तांबे यांच्याकडे उद्यान व क्रीडा स्थापत्य विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, जलनि:सारण विभाग तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन स्थापत्य बीएसयूपी, प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे.

या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विभागांच्या विभाग प्रमुखांमार्फत प्रशासकीय तसेच धोरणात्मक निर्णयांसंबंधीच्या नस्त्या आणि महापालिका समिती, स्थायी समिती यांना सादर करायचे सर्व प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्यामार्फत महापालिका आयुक्त यांची मान्यता घेऊनच सादर करण्यात याव्यात असे आदेशात नमूद केले आहे. अधिकारांमध्ये बदल करणे अथवा निरस्त करणे याबाबतचे हक्क आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.