Pimpri : शेतकरी,लघु उद्योजक, विद्यार्थी,युवकांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प – इम्रान शेख

एमपीसी न्यूज – शेतकरी,लघु उद्योजक, विद्यार्थी,युवकांच्या तोंडाला (Pimpri)पाने पुसणारा अंत्यत व्यवहार शून्य केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मितीचे कोणताही ठोस पावले उचलताना दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केली.

शेख म्हणाले की, आजच्या केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये लघुउद्योगाची खूप (Pimpri)घोर निराशा झाली असून लघु उद्योगास कोणतेही प्रकारच्या आर्थिक सवलती देण्यात आले नाहीत. दुष्काळाचे सावट देशावर असताना शेतमालाला भाव नसताना शेतकऱ्यांच्या बी बियाणे खताच्या किमतीमध्ये सवलती सरकारने दिलेल्या नाहीत. त्यामुळे  कृषी विकास दर किमान 2 टक्के वाढवा,यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सवलती देण्यात आला नाही. शैक्षणिक बजेटमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

Pune Traffic : येरवडा, सिंहगड, दत्तवाडी, डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेत बदल

पदवीपर्यंतचे शिक्षणात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.अन्नधान्य भुसार मालाच्या निगडित असणाऱ्या अप्रत्यक्ष करात देखील कपात करण्यात आलेली नाही. मालवाहतूक आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर होत असताना डिझेलवरील अबकारी करात कपात करण्यास सरकार पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेला आहे.या अर्थसंकल्पात शेतकरी,लघु उद्योजक, विद्यार्थी,युवक यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अत्यंत व्यवहार शून्य अर्थसंकल्प आहे. एकीकडे सरकार म्हणते की आम्ही कोट्यावधी लोकांना गरिबी रेषेचे वर आणलं.

दुसरीकडे  सरकारला 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याची घोषणा करत आहे.मग कोणत्या लोकांना  सरकारने करोडच्या संख्येने गरिबी रेखेच्या वर आणलेत? यात विरोधाभास दिसून येतो. स्वतःची पाठ थपथपून घेणार हा बजेट जमिनी वास्तविकते पासून दूर असल्याचे दिसत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले.

 

 

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ&t=13s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.