Pune : चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँगेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार?

एमपीसी न्यूज – आताच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघात पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पाटील यांनी कधीही जनतेतून निवडणूक लढविली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे पाटील यंदा प्रथमच कोथरूडमधून निवडणूक लढवीत आहेत. पण, त्यांचा विरोधात प्रचंड नाराजी आहे.

विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आल्याने त्यांचा चेहऱ्यावरील दुःख स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘माझा पाठीत खंजीर खुपसला, तरीही भारतीय जनता पक्षाचा विजय माझा कंठातून निघेल, अशी भावना त्यांनी थेट पाटील आणि खासदार गिरीश बापट, संजयनाना काकडे यांच्यासमोर बोलून दाखवली.

कोथरूड मतदारसंघातून मित्रपक्ष असेल, असे स्पष्टपणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे कोथरूडकरांचे लक्ष लागले आहे. कारण, कोथरूड मतदारसंघात मित्र पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे अखेरच्या क्षणी दिल्लीतून तिकीट कापण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.