Alandi : आळंदीत वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – आळंदी शहरात  दि.13 रोजी आज  ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.  वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे  चाकण रस्ता, देहूफाटा (वाय जंक्शन), मरकळ रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागली होती. तर प्रदक्षिणा रस्त्यावर नो पार्किंगच्या  फलका समोरच बेशिस्तपणे दुतर्फा चारचाकी वाहने पार्किंग केलेली दिसून येत होती. त्यामुळे तेथील रस्त्यावर सुद्धा मध्येच काही वेळ वाहतूक समस्या निर्माण होत होती.

Maval : श्री कृष्णराव भेगडे विद्या प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी जाहीर

वडगांव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता इ. ठिकाणी रस्त्यावर बेशिस्तपणे दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत अजून भर पडली होती. तसेच

अधिक मास निमित्त समाधी दर्शन व इतर कारणास्तव आलेल्या काही नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर बेशिस्तपणे  वाहने पार्किंग केल्याचे आढळून आले.

वाहतूक कोंडी समस्येचा त्रास  आळंदीतील  नागरिकांसह तेथील रस्त्यावरून इतर रहदारी करणाऱ्या प्रवाश्यांना सुद्धा झाला. चाकण रस्त्यावरील वाहनतळ पूर्ण पणे वाहनांच्या पार्किंगने भरल्याने काहींनी रस्त्यावरच वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग केली होती.

तसेच इतर  लग्न तिथी वेळी सुद्धा प्रदक्षिणा रस्ता, वडगांव रस्ता , गोपाळ पुरा ,चाकण रस्ता, केळगाव रस्ता इ.ठीक ठिकाणी वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने वाहने पार्किंग व्यवस्था जागेची (सुसज्ज नवीन वाहनतळाची) मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.