Markal : भगवा ध्वज छञपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक  – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – श्री मारुतीरायाच्या स्वयंभू मुर्तीने पावन झालेल्या मरकळ गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज अर्थात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेने मरकळ येथे उभा राहिला. त्याचे ध्वजारोहण रविवार दिनांक 13 ऑगस्ट  रोजी दुपारी 2 वाजता आमदार महेश  लांडगे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

Maval : श्री कृष्णराव भेगडे विद्या प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी जाहीर

यावेळी मरकळ (Markal) आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी, शिवभक्तांनी, धारकरी, वारकरी बंधूंनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार  महेश दादा लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले हा भगवा ध्वज छञपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे. छञपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या परस्त्रीला माते समान समजुन साडी, चोळी, बांगडी देऊन तीची सन्मानपुर्वक रवानगी केली. तशीच भावना ईत्तर धर्मातिल लोकांनी आमच्या माता भगिनींच्या बाबतीत ठेवली पाहीजे असे मत त्यांनी मांडले.

परम पवित्र भगव्या ध्वजाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. 40 फुट ऊंच ध्वज स्तंभावर भगव्या ध्वजाचे अनावरण महेश दादांच्या हस्ते करण्यात आले. छञपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या प्रसंगी पंचक्रोशीतील वारकरी, धारकरी,वेगवेगळ्या पक्षातील मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशनचे पी आय  सुनील गोडसे, शेंडे साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण स्टाफ घेऊन बंदोबस्त ठेवला त्यांना ही शाल व श्रीफळ देऊन गावकऱ्यांनी सन्मान केला. याबाबत माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.