Rahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – रहाटणी परिसरातील ज्ञानदीप कॉलनी श्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी एक लाख सात हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 20) पहाटे उघडकीस आली.

नरेंद्र गेनसिध्द बनसोडे (वय 38, रा. ज्ञानदीप कॉलनी श्रीनगर, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटे सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या किचनच्या खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडली. त्यावाटे घरात प्रवेश करून घरातून 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.