Bhosari Crime News : विनयभंगाच्या आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज – महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर भोसरी पोलिसांनी 48 तासाच्या आत अटक करत दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीला पिंपरी न्यायालयाने मंगळवारी (दि.18) 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

संजय दादाभाऊ माने (वय 42. वर्ष रा. मयुर मेडिकलचे मागे, चक्रपाणी वसाहत भोसरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुन्हयातील पिडीत महीलेस न्याय मिळावा या करिता दाखल गुन्हयात भोसरी पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार व पथकाने आरोपीला अटक करून  गुन्हयातील प्रत्यक्षदर्शी साक्षिदार यांचे कडे तपास करून आरोपी विरुद्ध दोषसिद्धी होईल असा सबळ पुरावा प्राप्त केला .
त्यामुळे गुन्हयाचा 48 तासात तपास पूर्ण करून आरोपीस दोषारोपपत्रासह मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, पिंपरी पुणे यांचे कोर्टात समक्ष हजर केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून केस फास्ट ट्रॅकवर चालवुन आरोपीस मंगळवारी (दि.18)  ३ वर्ष ६ महिने सक्त मजुरी व दिड हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपीस शिक्षा लागल्याने पिडित महिलेस न्याय मिळवून दिला.
ही कामगिरी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे)अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार, पोलिस हवालदार देढे, डामसे, पाटील करे, डगळे पोलीस शिपाई सागर जाधव, स्वामी नरवडे, महिला पोलीस शिपाई मुळुक यांनी ही  कामगिरी केलेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.