Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेलच्या तालुकाध्यक्षपदी महेश निंबाळकर यांची निवड

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Maval news) उद्योग व व्यापार सेल च्या अध्यक्षपदी युवा उद्योजक व शायनल  एन्टरप्राइजेसचे सर्वेसर्वा महेश निंबाळकर यांची दि.17 रोजी निसर्ग कार्यालय पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत विविध घटकातील स्तरांपर्यंत अनेक सेल मार्फत संघटना मजबूत करण्यात येत आहे.मावळ तालुक्यातील वाढत असलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाने त्याच क्षेत्राशी जाण असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना अधिकार देऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी कुशलतेने प्रयत्न करताना दिसत आहे.तळेगाव दाभाडे येथील युवा उद्योजक महेश निंबाळकर हे स्वतः उद्योग व व्यापार क्षेत्रात प्रचलित आहेत.

Gavthan Traffic : गावठाणात एकेरी वाहतूक सुरू

दरम्यान नवनियुक्त अध्यक्ष महेश निंबाळकर एमपीसी न्यूज सोबत बोलताना म्हणाले कि “राष्ट्रवादी चे पक्षप्रमुख शरद पवार साहेब,राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार,(Maval news) खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचाराने व आमदार सुनील आण्णा शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढी साठी मी कायम प्रयत्न करत राहणार.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

ह्या कार्यक्रम प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, उद्योग व्यापार सेल चे जिल्हाध्यक्ष सुभाष गव्हाणे, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे हेउपस्थितीत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.