Pune News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार, नंतर अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली

एमपीसी न्यूज : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करत त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हीच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन यात रेणू कडून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहित उमेश साठे (वय 27, रा. वडाळा, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 26 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने पीडित तरुणीला लग्न करण्याचे वचन देऊन तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्तीने नैसर्गिक, अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. या घटनेचे चित्रीकरण करून त्याने हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून 90 हजार रुपये घेतले. तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाण करत फसवणूक केली आहे. विमानतळ पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.