Nigdi : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून आकुर्डी येथे घडत होता.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित विश्वकर्मा याच्याविरोधात बलात्कार आणि बाल अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांपूर्वी फिर्यादी यांच्या 16 वर्षाच्या मुलीसोबत रोहितने प्रेमसंबंध जोडले. मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत तिच्याच घरी जाऊन शरीरसंबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिली. साडेतीन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावरून मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. वल्टे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.