Chinchwad : विजयादशमीनिमित्त राष्ट्र सेविका समितीचे रविवारी पथसंचलन

एमपीसी न्यूज – राष्ट्र सेविका समिती पुणे जिल्ह्याचे सघोष पथसंचलन विजयादशमी निमित्ताने पथसंचलन आयोजित केले आहे. यावर्षी प्रथमच हे संचलन रविवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

श्रीधरनगर चिंचवड भागातून हे पथसंचलन होणार आहे. वीर सावरकर मार्ग, लिंक रोड, श्रीधरनगर दत्त मंदिर, माटे शाळा, साई अपार्टमेंट, धोका प्रतिष्ठान मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यवाहिका सुनंदा अनंतपुरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.