Ravet : #डायटच्या_नानाची_टांग ! 😜😜

(अश्विनी जाधव )

एमपीसी न्यूज- डायट start करणे सोपे आहे पण ते consistently आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे #without_break चालू ठेवणं फार कठीण !! त्याचं काये ना आपण diet चालू केलं की स्पेशली आपल्या घरातल्यांना कसं नवीन नवीन dishes बनवायला सुचतं ना ☹️ भरीस भर म्हणून डझनभर खादाडीचे Groups जॉईन करून ठेवलेत. अहो सतत कोणीतरी काहीतरी चमचमीत फोटोज अपलोड करत असतं. अगदी आपले relatives आणि आजूबाजूचे सुद्धा.. त्यांच्या ही व्हाट्सअप स्टेटसला असलेच भुरळ पाडणारे फोटोज असतात. ते म्हणजे पूरी दुनिया हमारा diet तोडने के चक्कर में जूट जाती है😂😂 म्हणूनच मी आता ठरवलंय की डायट च्या नानाची टांग… आता डायट सुरू होईल ते येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच…😜😜 सो आता हे उरलेले 2 महिने माझी खादाड भ्रमंती अशीच चालु राहील😀

लहानपणापासूनच मला स्वतःला चायनीज मनापासून आवडतं. बरेच दिवसांपासून रावेत मधील #The_Red_ lantern आणि तिथल्या चायनीज आणि थाई फूड यांची बरीच चर्चा ऐकून होते. एक दिवस दिली धडक! तर नावातच Chinese झाक असलेल्या या restaurant ची आपली special अशी एक खासीयत आहे. Enter केल्यावरच Chinese Ambiance मुळे मस्त mood बनला 🤟

तसं छोटेखानी असलेलं हे The Red lantern  एकदम स्वच्छ आणि नीट नेटकं होतं. नावाला साजेल अशा #Red_lights मुळे mood जवळपास china border ला जाऊन पोचला होता 😂😃😃. #Chinese आणि #Lebanese_Culture ची झाक भिंतींवर पैंटिंगच्या रूपात मस्त उठून दिसत होती. एकंदरीतच माहोल मस्त जमला होता🤩

तर सगळ्यात पहिल्यांदा आलं आमचं स्टार्टर Honey Chilli Garlic Wings अर्थातच चिकन😉. खरंतर चिकन आणि हनी ही काही जोडगोळी नाहीये असं वाटत होतं खरं पण इतकं सुरेख balanced कॉम्बिनेशन जमलं होतं ना की आहाहा… म्हणजे जेवढं असायला पाहिजे तेवढं Spicy पण आणि हनी मुळे आलेला थोडासा गोडवा.. अप्रतिम डिश..फुल मार्क्स 👍🙂

#मेनकोर्स

1. #Triple_Schezwan_Rice  – खरं तर सगळ्यांची आवडती डिश पण #Authentic_Chinese कशाला म्हणतात ते कळावं म्हणून एकदा #खाच! मी तर खुश झाले.

2. #Green_Thai_Curry_Rice – एक अतिशय मस्त थाई डिश. करीची चव आणि रंग दोन्हीही अतिशय उत्तम जमून आलेले. भात आणि करी मिक्स केल्यावर जी काही चव जमून आली ना… लाजवाब😃👍 थाई फूडची आवड असेल तर नक्कीच खा मनापासून आवडेल 😊😊😋😋

_MPC_DIR_MPU_II

3. #Laksa_Soup– म्हणजे चेरी ऑन द टॉप. मस्त नारळाच्या दुधापासून बनवलेली घट्ट Spicy करी. त्यात Fresh Thai Veggies आणि थाई मसाल्यांचा जो काही कडक तडका जमून आला होता ना.. क्या बात !! मजा आली.. #नक्की_खा

आता इतकी छान खादाडी झाल्यानंतर #आइस्क्रीम_तो_बनता_हे_ना_बॉस… आणि जर ते #फ्राईडआइस्क्रीम असेल तर मग क्या बात!! नेहमीच्या आईस्क्रीमपेक्षा काहीतरी नक्कीच वेगळं. आजच्या या review मध्ये माझ्या शब्दांपेक्षा photos जास्त बोलके आहेत. थोडंसं स्वीट, मस्त कुरकुरीत (crunchy) लेअर आणि त्याच्या आत मस्त chilled वॅनिला आईसक्रीम.. आहाहा आणि वरून चॉकलेट topping.. #सुख😊😋😋 एक खाऊन थांबणारच नाही तुम्ही..(म्हणजे निदान मी तरी नाही थांबले😉😉😜)

मनसोक्त जेवण आणि त्यावर आइस्क्रीम हे समीकरण खरंच unbeatable आहे. आणि त्यात आईस्क्रीम जर असे भन्नाट असेल तर मग #बात_बन_जाये..😋😊👍 एकदा नक्की नक्की ट्राय करा ते म्हणतात ना काही तरी highly recommended का काय तेच ते 😋☺️

एकंदरीत खूपच भन्नाट आणि चविष्ट एक्सपिरीयन्स😋😋 थाई फुड खरोखर अतिशय ऑथेंटिक आणि मस्त होते. चायनीज पण अगदी मला आवडते तसेच !! आता पुढील भेट लवकरच पुन्हा काहीतरी नवीन ट्राय करायला 😊

टोटल खिशाला कात्री 750/- पण शब्दशः पैसा वसूल !! आणि तसंही खादाडी साठी काय पण🤩🤩

#लोकेशन –
#The_Red_lantern 
Thai , Shawarma & Chinese Cuisine
Sector 32 A, Ravet
भोंडवे कॉर्नर जवळ

https://maps.app.goo.gl/cxpKJZFnk3YDe3bs9

The_Red_lantern
एकदा खाऊन तर बघा 😊

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.