Ravet : रस्त्यात थांबलेल्या दोघांना मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – रिक्षातून जाताना लघुशंकेसाठी रस्त्यात थांबलेल्या दोघांना दोन जणांनी मिळून मारहाण करत लुटले. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री नऊच्या सुमारास किवळे ब्रिज येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

सीताराम गंगाराम राठोड (वय 25, रा. पुनावळे) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शंकर लक्ष्मण दाते (वय 25, रा. वाल्हेकरवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सिताराम एका रिक्षामधून जात होते. ते किवळे ब्रिज येथे आले असता लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले. त्यावेळी तिथे आलेल्या दोन चोरट्यांनी रिक्षाचालकाला व सिताराम यांना मारहाण केली. चोरट्यांनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण नऊ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलिसांनी शंकर याला अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.