Rekha Dubey : रेखा दुबे यांचा ‘डिजीटल इंडिया काँट्रीब्यूटर अवॉर्ड 2022’ने सन्मान

एमपीसी न्यूज – वर्ल्ड सेफ्टी ऑर्गनायजेशननॅशनल ऑफिस फॉर इंडिया स्टेट लेव्हल ओएचएसअँडई (ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी अँड द एनव्हार्यनमेंट) अवॉर्डस् 2022 च्या वतीने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल पुणेच्या सीईओ रेखा दुबे (Rekha Dubey) यांना वैयक्तिक पुरस्कार- डिजीटायजेशन क्षेत्रात डिजीटल इंडिया काँट्रीब्यूटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

रेखा दुबे यांना कामकाजाची प्रभावी पद्धतमानवी चुका कमी करणेकामाची नक्कल  आणि जागेची बचत याकरिता डिजीटल/ स्मार्ट हॉस्पिटल सॉफ्टवेअर विकसीत करून अंमलबजावणी केल्याने तसेच मूल्यांकन वर्ष 2021 करिता सर्वाधिक अद्वितीय कामगिरी बजावल्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Pimpri News : पुण्यातील 90 वर्षीय महिला75 वर्षानंतर गेल्या आपल्या पाकिस्तानमधील घरी

आम्ही डिजीटायजेशनकरिता करण्यात आलेल्या प्रयत्नांची दखल घेतली गेली आणि सन्मान प्राप्त झाल्याने मला समाधान वाटते आहे. डिजीटायजेशन व आरोग्य देखरेख तंत्रज्ञान पायाभूत सुविधा बळकटीकरण हेच भवितव्य आहेयावर आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आमचा ठाम विश्वास आहे”, असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे (Rekha Dubey) यांनी सांगितले.    

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.