Uddhav Thackeray : मनोरुग्णालयात उद्धव ठाकरेंसाठी बेड राखीव ठेवा, शिंदे गटाचं मेंटल हॉस्पिटलला पत्र

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात दसरा मेळाव्यानंतर सुरू झालेला कलगीतुरा संपूर्ण राजाने पाहिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेवरून शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी येरवडा येथील मनोरुग्णालयात उद्धव ठाकरे यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, अशा मागणीचा पत्रच रुग्णालयाला लिहिले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे या निमित्ताने दिसून आलं.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवावर टिप्पणी केली (Uddhav Thackeray) होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे अनेक मंत्री आणि कार्यकर्ते देखील नाराज आहेत. राज्यभरातून याचा निषेध केला जातोय. पुण्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तर येरवड्यातील मनोरुग्णालयाला एक पत्रच दिले आहे.
येरवडा भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांनी या मागणीचे पत्र येरवडा मनोरुग्णालयातील व्यवस्थापकांना दिले आहे. त्यांनी या पत्रात म्हटलं आहे, की असं वक्तव्य करताना उद्धव ठाकरेंनी त्या बाळाच्या घरच्यांचा कधी विचार केला आहे का? त्यांचं हे विधान अत्यंत हीन पातळीवरचं आणि खेदजनक आहे. सत्तेतून पायउतार झाल्यामुळे उद्धव ठाकरेंची मनस्थिती बिघडली असावी असं आम्हाला वाटतं. ते बिघडले असेल तर त्यावर उपचार होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयात उद्धव ठाकरेंसाठी एक जागा राखीव ठेवावी असा मजकूर त्यांनी या पत्रात लिहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.