Pimpri News : पवना,इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनावर भर; संदीप वाघेरे यांनी मानले आयुक्तांचे आभार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2023-24 च्या अंदाजपत्रकामध्ये शहरातून वाहणा-या  पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पुनरुज्जीवणासाठी (Pimpri News) बॉण्ड फंड स्कीमचा समावेश केल्याबद्दल माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आभार मानले.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना नदीसुधार व आदी प्रकल्पांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बॉण्ड ( रोखे ) फंड स्कीमचा समावेश केल्यास शहराच्या दृष्टीने हिताचे ठरणार असल्याचे पत्र तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना 15 फेब्रुवारी 2019 रोजी माझ्या वतीने देण्यात आले होते. या पत्रामध्ये शहरातील पवना नदीसाठी रिव्हर फ्रंट कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत पवना नदीसुधार प्रकल्पाचा डीपीआर लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

Bhosari News : राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयास नॅककडून ‘अ’ श्रेणी

 

या प्रकल्पासाठी खुल्या बाजारात बॉण्ड ( रोखे ) विक्री करून निधी उभारण्यात येऊ शकतो. तसेच नदी लगतच्या हरित पट्ट्यांमध्ये बदल करून भूखंडावर ज्यादाचा अधिकार ( प्रिमियम चार्जेस ) आकारून निधी उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. (Pimpri News) त्यानुसार ही योजना अमलात आणणेकामी महापालिका प्रशासनाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. या पाठपुरावाची दखल घेऊन महापालिका आयुक्त शेखर यांनी घेऊन सन 2023-24  च्या अंदाजपत्रकामध्ये बॉण्ड ( रोखे ) फंड स्कीमचा समावेश केला त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

याचबरोबर शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नदी काठच्या भागामध्ये टी.पी.प्लान योजनाही राबविता येईल. ग्रीन झोन मधील जमिनींचा विकास करून मुल मालक व महापालिकेसही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळेल. या मिळालेल्या उत्पन्नामधून नदीसुधार व आदी प्रकल्प यशस्वीरीत्या (Pimpri News) राबवून शहराचा चेहरामोहरा बदलता येऊ शकतो अशी विनंती देखील आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघेरे,राकेश मोरे उपस्थित होते..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.