Pimpri : सुदृढ आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवडची आरोग्य व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत आरोग्य विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आकुर्डी येथील समाजसेवा केंद्रात शुक्रवार (दि. 5) ते रविवार (दि. 7) रोजी ही व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे यंदा तिसरे वर्ष आहे.

रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. संजीव दाते, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ आदी उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अच्युत कलंत्रे यांना रोटरी धन्वंतरी पुरस्कार देण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि. 5) बालरोगतज्ज्ञ डॉ. ललितकुमार धोका व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफणार आहेत. ते लहान ‘मुलांचे शोषण (शारीरिक, मानसिक व लैंगिक)’ या विषयावर बोलणार आहेत. शनिवारी (दि. 6) फिजिशियन डॉ. श्रीरंग गोखले यांचे ‘थ्री इडियट्स… साथीचे आजार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि. 7) रुबी हॉल क्लीनिकचे अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. कपिल झिरपे ‘अवयवदान एक श्रेष्ठ दान (समज व गैरसमज)’ या विषयावर बोलणार आहेत. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. शैलेश पालेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सातव लॅबोरेटरीतर्फे हिमोग्राम, ब्लड शुगर आणि थायरॉईड टेस्ट करण्यात येणार आहे. व्याख्यानमाले दरम्यान उपस्थितांना आरोग्य तपासणी कार्ड देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे तपासणी कार्ड असेल त्यांच्यासाठी मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आकुर्डी पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या समाज सेवा केंद्रात दररोज सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत ही व्याख्यानाला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.