Rotary Club : रोटरी क्लब चिंचवड पुणे तर्फे डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज  – रोटरी क्लब ऑफ चिंचवड – पुणे, भारत (क्लब क्र. 50476) हा रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 मधील सामाजिक बांधिलकी जपणारा एक अग्रगण्य क्लब आहे.(Rotary Club) रोटरी क्लब चिंचवड तर्फे ब्रिक्स”,मॉस्को, रशियाच्या अध्यक्षा डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांना रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी

नियोजित प्रांतपाल रोटेरियन शीतल शाह यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील विशेष मान्यवर रोटेरियन समीर रुपाणी,संचालक, आंतरराष्ट्रीय सेवा, रोटेरियन हेमंत दोशी, सहसंचालक, व्यावसायिक सेवा, रोटेरियन विजय तारक, सहाय्यक प्रांतपाल, तसेच रोटरी क्लब चिंचवड पुणे चे अध्यक्ष रोटेरियन महावीर सत्यण्णा आणि सचिव रोटेरियन पराग जोशी उपस्थित होते.

“ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रेडिशन्स” या प्रादेशिक सार्वजनिक संस्थेच्या अध्यक्षा आणि “ब्रिक्स पीपल चेंजिंग लाइफ”या संस्थेच्या व्यवस्थापिका डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय सेवागौरव पुरस्कारासाठी रोटरी क्लब चिंचवड, पुणे, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 यांच्यातर्फे निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय धर्मादाय, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम,आंतरराष्ट्रीय आणि आंतरप्रादेशिक प्रकल्प यांच्या माध्यमातून केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

 

MPC News Podcast 26 December 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

यावेळी रशियन शिष्टमंडळातील ब्रिक्स पीपल चेंजिंग लाइफ; या कार्यक्रमा बाह्यसंबंध समन्वयक, रशियन फेडरेशनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एमजीआयएमओ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य श्री. दिमित्री कुर्बातोव्ह ,“ब्रिक्स पीपल्स चेंजिंग लाइफ प्रोग्राम” चे भागीदार, IYES फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रकल्प, नवी दिल्ली चे संचालक श्री. राहुल शर्मा, (Rotary Club) पत्रकार आणि पटकथा लेखक श्रीमती अनास्तासिया शिकितीना, रशियन दूरदर्शन आणि व्यावसायिक चित्रपट तांत्रिक सहाय्यक दिमित्री चिगलींत्सेव, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ. स्नेहल तावरे, डॉ. लालसिंह तावरे,आणि रोटाऱ्य क्लब ऑफ रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या अध्यक्षा रोट्रॅक्टर रेणुका सिंग आणि इतर रोट्रॅक्टर्स या वेळी उपस्थित होते.

डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांना सेवा उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करणे ही रोटरी क्लब चिंचवड-पुणेसाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रशियन शिष्टमंडळाचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीच्या अतूट बंधाचे प्रतीक आहे” असे प्रतिपादन आरटीएन प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले, आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे समन्वयक यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.

विशेष अतिथी रोटेरियन समीर रुपाणी यांनी आपल्या भाषणात नमूद केले, “रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 हा भारतातील आघाडीचा जिल्हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि प्रकल्पांना कायमच प्रोत्साहन देतो. रोटरी क्‍लब चिंचवड-पुणे यांनी आयोजित केलेल्या या स्तुत्य कार्यक्रमाचे मी कौतुक करतो.” आपल्या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांनी रोटरी क्लब चिंचवड-पुणे चेआभार मानले. “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला हा पुरस्कार स्वीकारून आपणास संबोधित करताना विशेष आनंद होत आहे.

रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आम्हा रशियन शिष्टमंडळाचा भारत दौरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि प्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉय यांच्यातील जिव्हाळ्याचा बंध आम्ही कायम जपतो. ब्रिक्सच्या व्यासपीठाद्वारे त्यांचा शांतता आणि सौहार्दाचा संदेश जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो”, असे त्यांनी प्रतिपादित केले.

 

Dr. Lyudmila Sekacheva Addressing the Audience

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटेरियन शीतल शाह यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था 200 हून अधिक देशांमध्ये 1.2 दशलक्ष कृतीशील सदस्यांच्या मदतीने मोठे समाजकार्य करत आहे. (Rotary Club) साक्षरता आणि शांततेपासून पाणी आणि आरोग्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोटरी भरीव कार्य करीत आहे.” सचिव रोटेरियन पराग शाह यांनी पुरस्कार विजेत्या डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांचा परिचय करून दिला,

तर रोटेरियन प्रसाद गणपुले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रोटेरियन सुरेंद्र शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष रोटेरियन महावीर सत्यण्णा, (Rotary Club) निर्वाचित अध्यक्ष रोटेरियन यतीश भट्ट, सचिव रोटेरियन पराग जोशी, रोटेरियन सुरेंद्र शर्मा, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा रोटेरियन डॉ शिल्पागौरी प्रसाद गणपुले आणि रोटेरियन प्रसाद गणपुले यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.