Pimpri News : पिंपरी-चिंचवड येथील 75 महिलांनी घेतला मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचा लाभ

एमपीसी न्यूज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.25)  महिलांसाठी स्तनाचा कर्करोग (Pimpri News) आणि हाडांची घनता याचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी 75 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे व लायन्स क्लब चे VDG2 लायन् सुनिल चेकर यांच्या हस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा वैद्य, संध्या कुलकर्णी, रेणुका कुलकर्णी, मनीषा नातू, शलाका असलेकर, मंजिरी शास्त्रबुधे व स्मिता तसेच,लायन्स क्लब च्यावतीने  लायन सुनील जी चेकर (VDG-2) ला. सलीमजी शिकलगार (ZC ),ला. हर्ष नायर (गायडिंग लायन) लायन्स क्लब पुणे इनोव्हेशन चे पदाधिकारी ला. गोपाल बिरारी  (अध्यक्ष ),ला. संदीप पोलकम (सेक्रेटरी), ला. प्रशांत कुलकर्णी (मार्गदर्शक),ला. एकनाथ चौधरी  (सहखजिनदार), मेजर प्रताप भोसले,ला. वंदना चौधरी, ला. सुषमा बिरारी, ला. किशोरी हरणे, ला. प्रियांका चौधरी,ला. सचिन कुलकर्णी, ला. वसंत गुजर (कॅबिनेट),ला. संदेश लाड (GST) इ. उपस्थित होते.

Rotary Club : रोटरी क्लब चिंचवड पुणे तर्फे डॉ. ल्युडमिला सेकाचेवा यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

या शिबिरात संजीवनी क्लिनिकच्या डॉ. प्रियांका दळवी यांचे विशेष आभार, त्यांनी तपासणीसाठी त्यांचे क्लिनिक मोफत दिले. स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी (Pimpri News) सरिता सोनावळे आणि जोशी मॅम त्याचप्रमाणे धनश्री हॉस्पिटलच्या बोन डेन्सिटी तपासणीसाठी डॉ. पटवर्धन आणि टीमचे आभार. डॉ. संजीव संभू, डॉ मनीषा गरुड यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.

महिलांचे आरोग्य ही खरोखरच एक मोठी समस्या आहे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तसेच लॉयन क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन हे नेहमीच या क्षेत्रात चिंतित आणि केंद्रित असतात. अशा विधायक कार्यासाठी दोन्हीही संस्था अग्रेसर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.