RPI News : आरपीआएच्या वाहतूक आघाडी शहराध्यक्षपदी सदाशिव तळेकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी खराळवाडीतील सदाशिव तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (RPI News) वाहतूक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अजिज शेख यांनी तळेकर यांना नियुक्ती पत्र दिले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (RPI News) त्यांचा कालावधी एक वर्षाचा म्हणजेच 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे.

Pune news : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पुणे प्रसिद्धी प्रमुख पदी संजय अगरवाल

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने पक्षाला अभिप्रेत (RPI News) असणारी वाहतूक संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रिय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.