Diwali celebration : पाडव्या निमीत्त पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरातील मंदिरे दिव्यांनी उजळली

एमपीसी न्यूज –  दिवाळीच्या पाडव्यानिमित्त पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील देवांची मंदिरात दिव्यांची आरास मांडून मंदिरे दिव्यांनी उजळून काढण्यात आली होती. (Diwali celebration) हा उपक्रम आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आला होता.

आकर्षक दिव्यांची रोषणाई, प्रसन्न करणाऱ्या पूजाअर्चेने सर्व मंदिरांचे परिसर उजळून गेले होते. पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या या सर्व मंदिरांची दृष्ये डोळ्यांची पारणे फेडणारी ठरली.यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, ज्येष्ठ नागरिक दामोदर काशीद, जयवंत देवकर, सामाजिक कार्यकर्ते सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, संजय जगताप, नवनाथ जांभुळकर, शिवाजी कदम, नवनाथ देवकर, सामाजिक कार्यकर्त्या कावेरी जगताप, उर्मिला देवकर, शोभा जांभुळकर आणि चावडी ग्रुपचे सदस्य, भाविक उपस्थित होते.

RPI News : आरपीआएच्या वाहतूक आघाडी शहराध्यक्षपदी सदाशिव तळेकर यांची नियुक्ती

यावेळी पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सूर्यमुखी गणेश मंदिर, कान्होबा मंदिर, नवी सांगवी येथील महालक्ष्मी मंदिर, गजानन नगर येथील गजानन महाराज मंदिर, काटेपुरम चौक येथील खाडेबाबा मठ याठिकाणी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.(Diwali celebration) अप्रतिम रांगोळी आणि दिव्यांमुळे सर्व मंदिरांचे परिसर तेजोमय झाले होते. दीपोत्सवाच्या मंद उजेडात सर्व मंदिरे उजळून गेले होते. पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या या सर्व मंदिरांची दृष्ये डोळ्यांची पारणे फेडणारी ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.