Surotsav : 5  हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज – सुरोत्सवामुळे कोथरुडवासीयांची दिवाळी गोड आणि संगीतमय झाली, असे प्रतिपादन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. (Surotsav) कोथरूडमध्ये आयोजित फराळ वाटपात ते बोलत होते. कोणतीही निवडणूक नाही पण सामाजिक बांधिलकी जपत गरजवतांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम हा स्त्युत उपक्रम आहे, असेही मोहोळ म्हणाले.

वाढत्या महागाईत दिवाळी फराळाचे साहित्यही महागल्याने गोरगरिबांना दिवाळी साजरी करणे शक्य होत नाही. या गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून (Surotsav) माजी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांच्या वतीने नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे सुमारे 5 हजार नागरिकांना दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले आहे.

Diwali celebration : पाडव्या निमीत्त पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरातील मंदिरे दिव्यांनी उजळली

हे फराळ वाटप माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.(Surotsav) केवळ नागरिकच नाही, तर पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कोथरूड भागातील रस्त्यावरील गरीब लोकांनाही यावेळी दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.