Pune : 64500 रुपये दराच्या बनावट चलनी नोटा जप्त; दोघांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यात 64 हजार 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 

शुभम दिलीप क्षिरसागर (वय 24) व राहुल दिनकर वचकल (वय 20 वर्ष दोघे रा. लोणंद जिल्हा सातारा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी साता-याहून बनावट चलनी नोटा देण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार, सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून 2000 रु. दराच्या 3 नोटा, 500 रुपये दराच्या 80 नोटा, 200 रुपये दराच्या 92 नोटा व 100 रुपये दराची 1 नोट अशा एकूण 64 हजार 500 रुपये दराच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.