RTO : अधिकाऱ्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – बनावट सही करून गाडी विकल्या (RTO) प्रकरणी त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोप विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

सचिन काशिनाथ गव्हाणे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार मे 2021 ते जून 2022 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन गव्हाणे याचा ट्रक त्याचा भाऊ समीर याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे अर्ज करून त्यावर सचिन याची स्वतःच सही करून कागदपत्र दिली होती. त्यानंतर सचिन गव्हाणे याची गाडी विशाल टाव्हरे यांच्या नावावर करून दिली होती. सचिन याने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी येथे फिर्याद दिली होती. त्याचा भाऊ समीर तत्कालीन सहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मिरचीकर आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान 2019 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे दोषारोप दाखल करण्याचे परवानगी बाबत प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. या प्रकरणात सचिन याने वेगवेगळ्या कार्यालयात ई-मेल व तक्रारी केल्या आहेत. परिवहन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध या तक्रारी केल्या आहेत. तसेच वृक्षारोप दाखल करण्यास लवकर परवानगी द्यावी यासाठी तो सातत्याने ईमेल करत असतो. मागील वर्षभरापासून तो फिर्यादी अजित शिंदे यांच्या कार्यालयात येऊन आपण अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी बंद करण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन येण्याची मागणी करत होता.

Sahakar Bharati : नागरी सहकारी बॅंकांच्या संचालक सदस्यांना सलग10 वर्षे कामाची संधी असावी

दरम्यान, सुरुवातीला शिंदे (RTO) यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, त्यांनीच पेंशनशी लाख रुपये एकत्र गोळा करून द्यावे अशी मागणी शिंदे यांच्याकडे केली होती. तरीही अजित शिंदे दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी त्यांनाच धमकी दिली होती. शेवटी शिंदे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गार्डन तक्रार दिली आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.