PCMC : 11  महिन्यात 9076 महिलांनी घेतला जननी सुरक्षा योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज  – माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी ( PCMC) करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी – चिंचवड शहरात या योजनेचा एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 अशा 11 महिन्यांच्या कालावधीत 9 हजार 76 महिलांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे यांनी दिली.

Rule Change From 1st April : आजपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण आणणारे नऊ महत्वाचे बदल

केंद्र सरकारमार्फत 12 एप्रिल 2005 रोजी जननी सुरक्षा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती -जमाती व दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार 8 मे 2013 पासून लाभार्थ्यांचे वय व अपत्यासंबंधीच्या अटी शिथिल केलेल्या आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच, या महिलांची प्रसूती आरोग्य संस्थेत व्हावी, यासाठी प्रयत्न करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती – जमाती या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना शासकीय व खासगी मानांकित आरोग्य संस्थेत झालेल्या बाळंतपणानंतर हा लाभ देय आहे. शहरातील शासकीय आरोग्य संस्था, मानांकित खासगी आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या पात्र महिला लाभार्थ्याला 600
रुपये दिले जातात. पात्र लाभार्थी महिलेची खासगी रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागल्यास 1500 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जात आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

# बँक खाते पासबुक झेरॉक्स
# बाळाच्या आईची आधार कार्ड झेरॉक्स
# एएनसी कार्ड झेरॉक्स
# जातीच्या दाखल्याची झेरॉक्स (एससी/एसटी) किंवा शाळा सोडल्याचा दाखला

योजनेतील मानांकीत रुग्णालये

शहरी भागात वैद्यकीय महाविद्यालये, नगरपालिका व महापालिका यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्र, नागरी कुटुंब कल्याण केंद्र व त्यांच्याकडील इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ
देण्यासाठी मानांकित केलेली ( PCMC) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.