Mumbai News : सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरने २७ मार्चला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपासून सचिन घरीच होम क्वारंटाइन होता. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार तो रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे.

सचिननेच ट्विट करत ही माहिती दिली आहे.

“माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलं आहे.

आज २ एप्रिल असल्याने त्याने २०११ साली विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलं आहे. “सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने म्हटलं आहे. त्याने भारतीय झेंड्याचा इमोन्जीही वापरला आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या सचिनपाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती शनिवारीच समोर आली. होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.