Wadgaon Maval News : प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्र सुरू

एमपीसी न्यूज  – प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा उपकेंद्र व नगरपंचायत वडगाव कातवी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले असून त्याचे उदघाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. 

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मंगेशकाका ढोरे, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, आरोग्य समन्वयक श्री.सोनवणे, बीडीओ भागवत साहेब, उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, किरण म्हाळस्कर आणि आशाताई आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागचे डॉक्टर व शहरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले कि, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जाताना ओळखपत्र सोबत घेऊन जावे तसेच कोरोना प्रतिबंधक लस दर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत घेता येईल.

तरी वडगाव पंचक्रोशीतीली ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.