Sahitya Sammelan News : जयंत नारळीकर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

एमपीसी न्यूज – 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संमेलन कुठे होणार यावरुन नाशिक आणि दिल्लीत बरीच रस्सीखेच झाली. त्यानंतर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकवर शिक्कामोर्तब करण्यात आले. साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती, अखेर जयंत नारळीकर यांच्या नाव निश्चित झालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.