Sangavi : पीएमपीएमएलला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सांगवी फाट्याजवळ पीएमपीएमएल बसला धडक बसून झालेल्या (Sangavi) अपघातात 26 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश भीमराव भालेराव ( वय 26, रा.उरळी देवाची) असे अपघातात मृत्यूमुखी झालेल्या  दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Chikhali : जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘अलंकरण समारोह’ संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास सांगवी फाट्याजवळील ढोरे पाटील पुलावर घडली. घटनेच्यावेळी पीएमपीएमएल बस चिंचवड आगारातून प्रवाशांना घेऊन पीएमसीकडे जात होती. बसच्या विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने तो पीएमपीएमलला जोरात धडकून अपघात झाला. यात त्याचा (Sangavi) मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.