Sangavi News: यंदा सांगवीत भरणार पवनाथडी जत्रा

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या खंडानंतर (Sangavi News) पवनाथडी जत्रा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे 16 ते 20 डिसेंबर असे पाच दिवस भरणार आहे. महिला बचत गटांसाठी एकूण 400 ते 450 स्टॉल असतात. एका स्टॉलमध्ये दोन बचत गटांना जागा दिली जाते. असे एकूण 800 ते 900 स्टॉल असणार आहेत.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्‌या सक्षम व्हाव्यात, म्हणून पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते.

Pimpri News : राज्यपालांवर गुन्हा दाखल करा, शिवप्रेमींची पोलिसांकडे मागणी

दोन वर्षांपूर्वी सांगवीतील 9 मार्च 2020 ला पवनाथडी जत्रा झाली होती. त्यानंतर कोरोना उद्रेक सुरु झाला. परिणामी, पावणेतीन वर्षे जत्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना महामारी संपल्या सारखी परिस्थिती झाली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे यंदा पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

समाज विकास विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (Sangavi News) यांनी मंजुरी दिली आहे. जत्रेत महिला बचत गटांसाठी एकूण 400 ते 450 स्टॉल असतात. एका स्टॉलमध्ये दोन बचत गटांना जागा दिली जाते. असे एकूण 800 ते 900 स्टॉल असणार आहेत. जत्रेतील स्टॉलसाठी शहारातील महिला बचत गटांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.