Sangavi : महेश मंडळाकडून विवेकानंद प्रशालेस सँनिटायझर मशिन भेट

Sanitizer Machine gift to Vivekananda School from Mahesh Mandal : दोन कॉन्टँक्टलेस ओटोमँटिक हँण्डसँनिटायझर मशिन भेट

एमपीसी न्यूज – सांगवी परिसर महेश मंडळ ( माहेश्वरी समाज ) यांच्या वतीने दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेस दोन कॉन्टँक्टलेस ओटोमँटिक हँण्डसँनिटायझर मशिन भेट देण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जरी शाळा बंद असल्या तरी शालेय क्रमिक पुस्तके पालकांकडे सुपूर्द केली जात आहेत. तसेच माजी विद्यार्थ्यांचे दुबार दाखले, बोनाफाईड प्रमाणपत्रे यामुळे नागरिकांची ये-जा सुरु आहे.

शिक्षकेतर कर्मचारीही शाळेत कार्यरत असल्याने मंडळाच्या वतीने या दोन मशिन्स प्रशालेस भेट देण्यात आल्या.

मंडळाचे अध्यक्ष सतिश लोहिया आणि पदाधिकारी निलेश अटल, विवेक झंवर, पंकज टावरी व सतीश पवार यांच्या हस्ते या मशिन्स प्रशालेचे पर्यवेक्षक विश्वास जाधव व त्यांचे सहकारी शिक्षक संजय झराड, राजू रघावंत, अनिल पाटील यांनी स्वीकारल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like